धक्कादायक ! धावत्या शिवशाहीत तरुणीचा विनयभंग
धक्कादायक ! धावत्या शिवशाहीत तरुणीचा विनयभंग
img
दैनिक भ्रमर
पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक आहे. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत एका तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. बस थांबल्यानंतर तरुणीने याची तक्रार बस वाहक आणि प्रवाशांना सांगितला.


मिळालेल्या माहितीनुसार, एक 24 वर्षीय तरुणी पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास करत होती. यावेळी बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घडली. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने तरुणी भयभीत झाली होती. आष्टा ते सांगलीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. अखेर एसटी बस स्टँडवर थांबल्यानंतर तरुणीने हा सगळा प्रकार बस वाहक आणि प्रवाशांना सांगितला. त्यावेळी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रवाशांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी संशयित वैभव वसंत कांबळे (वय 34 रा. दुधारी मारुती मंदिर जवळ, वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एसटी बसमधील प्रवास महिलांसाठी सुरक्षित समजला जातो. मात्र, सांगलीतील या घटनेने आता एसटी देखील असुरक्षित झालीय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group