राज्यात महिला अत्याचाराचा घटनांमध्ये वाढ होत असून सध्या महिला कुठेही सुरक्षित नाही. कामाचे ठिकण असो वा शिक्षणाचे ठिकण एवढंच काय तर स्वतःच्या घरात सुद्धा आजची स्त्री सुरक्षित नाही. अशीच एक महिला अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या पतीसोबत विभक्त राहणाऱ्या नवविवाहीत सुनेवर सासऱ्याने आणि त्याच्या मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पीडितेने आणि तिच्या माहेरकडील कुटुंबीयांसोबत पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दिली. ठाणे पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरा आणि त्याच्या मित्रावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64,127 (4), 351 (3), 74 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत मात्र, लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलीस म्हणाले.
पीडितेने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, पीडिता आणि तिचा पती आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. सासरच्यांपासून पतीसोबत वेगळे राहणाऱ्या सुनेबद्दल 52 वर्षीय सासऱ्याच्या मनात आकस होता. दरम्यान, एके दिवशी 30 जानेवारी रोजी सासरा सुनेकडे अचानक आला आणि त्याने तिस तुला तुझ्या आई-वडीलांकडे सोडतो, असे सांगत जबरस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आई-वडीलांकडे घेऊन जाण्याचे आमीश दाखवणाऱ्या सासऱ्याने सदर सुनेस भलत्याच मार्गाने आपल्या स्वत:च्या घरी आणले आणि जवळपास 15 दिवस डांबून ठेवले. सासरा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मित्रास बोलावून घेतले आणि दोघांनी आपला लैंगिक छळ केला असेही पीडितेने म्हटले आहे.
दरम्यान, जवळपास 15 दिवसांपासून सुरु असलेला छळ सुरुच होता. मात्र, एकदा सासरा झोपी गेल्याचे पाहून आपण कशीबशी सुटका करुन घेत, हळूच पळ काढला आणि माहेर गाठले. त्यानंतर कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिल्याचेही पीडिता सांगते. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, गुन्हाही दाखल केला आहे. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा: