दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत असून एकीकडे डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्यामुळे खळबळ उडालेल्या वैद्यकीय क्षेत्रातून आज पुन्हा एकदा डॉक्टर असलेल्या तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचा वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
आदित्य नांबियार (सध्या रा. सोलापूर, मूळ मुंबई) असं आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे. आदित्यने नुकतंच वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. आदित्य नांबियार या डॉक्टरने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आदित्य हा मूळचा मुंबईचा असल्याने नातेवाईकांना माहिती देण्यात आली असून नातेवाईक सोलापूरकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.
आदित्य नमबियार गळा कापून घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी ही आत्महत्या राहत्या खोलीत केली आहे. नमबियार हा सोलापूरमध्ये भाड्याने राहात होता. डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आदित्य नमबियार याचे वैद्यकीय शिक्षण सोलापूरमधील डॉ. वैशंपयान स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. नमबियार याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकतेच शिकाऊ डॉक्टर म्हणून सेवेला सुरुवात केली होती. नमबियार याचा मृतदेह शवविच्छादनासाठी सोलापूरच्या सीव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेला आहे.