नाशिकरोड परिसरात जन्मदात्या वडिलांनीच केला मुलाचा खून
नाशिकरोड परिसरात जन्मदात्या वडिलांनीच केला मुलाचा खून
img
Chandrakant Barve
नासिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- पत्नी नांदावयास येत नसल्याच्या नैराश्यातून व्यसनाधीन पतीने आपल्या तिसरी शिकणाऱ्या नऊ वर्षीय मतिमंद मुलाचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या करून स्वतःच्या मुलाला गोणीत टाकून पत्नीच्या बहिणीच्या घरी ठेवून पळून गेल्याची घटना नाशिक रोड परिसरात घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सुमित भारत पुजारी व त्याची पत्नी सारिका सुमित पुजारी हे आपल्या प्राची,सिद्धार्थ व गणेश या तीन मुलांसोबत जेलरोड मंगलमूर्ती नगर येथे राहत होते. गेल्या दीड महिन्यापासून पत्नी सारिका निघून गेल्यामुळे सुमित पुजारी हा प्रचंड व्यसनाधीन झाला होता. त्याच दारूच्या नशेत त्याने आज दुपारच्या सुमारास इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या मतिमंद गणेश या साडेनऊ वर्षीय बालकाचा गळा आवळून त्याची हत्या केली व मृतदेह गोणीमध्ये भरून टाकून तो पत्नी सारिकेची बहीण राहत असलेल्या कॅनल रोड,इंदिरानगर,जेलरोड येथील घरी गेला.

त्यावेळी त्याचा मेहुना घरी असल्याचे पाहून त्याला पैसे दिले व मला दारूची बाटली घेऊन ये असे सांगितले, मेहुना दारूची बाटली आणावयास गेला असता सुमित पुजारीने गोणीत बांधलेले आपल्या बालकाचा मृतदेह घरातील पलंगावर ठेवून तेथून पळ काढला. व त्यानंतर सुमितने मेहुणी ला फोन करून माझा लहान मुलाला मी मारून टाकले व तुझ्या घरात ठेवले आहे, असे सांगितले.

मतिमंद नातू गणेश हा दोन-तीन तासापासून दिसत नसल्याने आजोबा भारत पुजारी यांनी शोधाशोध घेतली, इतरत्र फोन लावले. तेव्हा समजलं की मुलगा सुमितने त्याला त्याच्या मावशीच्या घरी सोडले आहे. त्यांनी तेथे जाऊन खात्री केले असता गणेश हा गोणीत निचपित पडलेला होता.त्याला तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले असता बिटको रुग्णालयातील डॉ. ओसवाल यांनी त्यास मयत घोषित केले घटनेची माहिती समजतात उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन नराधम सुमित पुजारी या बापास ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group