“मुस्लीम असल्याची लाज वाटतेय..”; पहलगाम हल्ल्यानंतर ''या'' गायकाची प्रतिक्रिया
“मुस्लीम असल्याची लाज वाटतेय..”; पहलगाम हल्ल्यानंतर ''या'' गायकाची प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या  दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झालेलं असून अनेक जण काझमी झाले आहेत. या घटनेचा सर्वच स्तरातून न्सिहेध होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, या घटनेबाबत प्रसिद्ध बॉलिवूड गायक सलीम मर्चंटने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

“मला मुस्लीम असल्याची लाज वाटू लागली आहे”, असं ते या व्हिडीओत म्हणाले. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधून गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.

या व्हिडीओमध्ये सलीम म्हणाला, “पहलाममध्ये जे निर्दोष लोक मारले गेले, ते यासाठी मारले गेले कारण ते हिंदू होते, मुस्लीम नाही. मग अतिरेकी मुस्लीम आहेत का? नाही, ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम ही शिकवण देत नाही. कुराण शरीफच्या सूरह अल-बकराहच्या आयत 256 मध्ये म्हटलं गेलंय की धर्मात कोणतीही बळजबरी नसते. हे कुराण शरीफमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे.”

“एक मुस्लीम असून मला हे सर्व पाहून लाज वाटतेय की निर्दोष हिंदू भावाबहिणींची निर्दयपणे हत्या करण्यात आली, कारण ते हिंदू आहेत. हे सर्व कधी संपणार? काश्मीरमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोक खूप चांगल्याप्रकारे राहत होते. आता त्यांना पुन्हा समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मी याबद्दलचं दु:ख आणि राग कसा व्यक्त करू हेच समजत नाहीये”, असं तो पुढे म्हणाला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group