जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर होताना दिसत आहे. सदर घटनेनंतर या परिसरातून जम्मू काश्मीर येथे रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान मनमाड आणि परिसरातून येथील आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला गेलेले सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरूप असल्याची माहिती संचालक आनंद दरगुडे यांनी दिली.
सध्या हे सर्व पर्यटक श्रीनगर येथे आहेत. गुरुवारी दुपारी महाराष्ट्राचे शिवसेना नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी या सर्व पर्यटकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. तसेच थेट श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष व्यवस्था ही करून दिली.याबद्दल सर्व प्रवाशांनी शिंदे यांचे आभार मानले. आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून संचालक आनंद दरगुडे हे दहा ते बारा पर्यटकांना घेऊन जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले. जम्मू काश्मीर मधील गुलबर्गा येथे पर्यटकांसोबत अडकून पडले.पहलगाम येथे त्यांचा नियोजित दौरा मात्र झालेला नाही. तेथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हा दौरा रद्द करून ते श्रीनगर येथे थांबलेले आहेत. तेथून आता सर्व प्रवासी परतीच्या मार्गाला लागणार आहेत.
उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी सर्व या सर्व पर्यटकांची भेट घेतली पहलगाव येथे यात्रेकरूंवर आणि पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या तेथे असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळेच पर्यटकांना आता परतीची ओढ लागली आहे. आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पर्यटक हे १८ एप्रिलला काश्मीर येथे गेले. सफर सुरू असताना पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ल्याचे वृत्त आले आणि सर्व हादरून गेले. घटना घडली तेव्हा हे सर्व पर्यटक गुलमर्गला होते. तेथून हल्ल्याचे ठिकाण शंभर ते सव्वाशे किलोमीटर दूरवर आहे.
जम्मू काश्मीर येथील घटनेमुळे एकंदरीत पर्यटन क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. परंतु आमचे सर्व पर्यटक शुक्रवार पासून त्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. ग्राहकांना सुविधा पुरवताना त्यांच्या सुरक्षेला आमच्या कंपनीने नेहमीच प्राधान्य दिले आहे.भविष्यातही पर्यटकांची सुरक्षा ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.
- आनंद दरगुडे, संचालक आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स