राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अनेक धक्कादायक आणि गंभीर घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान, आता अतिशय धकाकदायक अशी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाला नग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. एवढंच नाहीतर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही या तरुणाने केला.कोल्हापूरमध्ये बिहारलाही लाजवेल अशी भयानक घटना घडली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील मुरगुड परिसरात ही घटना घडली. सौरभ कांबळे ( वय २४ वर्ष) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला मुरगुड परिसरात राहणाऱ्या ३ ते ४ जणांनी तरुणाला विवस्त्र करून रॉड, काठ्या आणि लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली. या तरुणाचं आधी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर या तरुणाला मारहाण करण्यात आली. या तरुणाच्या तावडीतून सुटून सौरभने कसाबसा आपला जीव वाचवला. त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून उपचार सुरू आहे. या तरुणाला मारहाण का झाली, याची कारण अजून समोर आले नाही. सौरभला मारहाणीचे व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
'मी चहा पित होतो, प्रशांत करडे नावाचा तरुण तिथे आला. त्यांनी मला मोठ्या गाडीत बसवलं आणि कॅनलवर घेऊन गेले. तिथे मला तिघांनी नग्न करून बेदम मारहाण केली. मी तिथून निसटून पळालो. त्यातला एक जण हा माझा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मला जातीवाचक शिवीगाळ करत होता. लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. प्रायव्हेट पार्टला धरून अमानुषपणे मारहाण केली, असं जखमी सौरभ कांबळे यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.