कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना डिंपलला किस करत राहिला.. पुढे काय झालं ?
कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना डिंपलला किस करत राहिला.. पुढे काय झालं ?
img
दैनिक भ्रमर
हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय दिग्गज अभिनेते  विनोद खन्ना यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत प्रत्येक मोठ्या अभिनेत्रीसोबत काम केले आहे.त्यांच्याच एका चित्रपटातील चित्रीकरणाचा एक किस्सा समोर आला आहे. या सीन मध्ये सिन संपल्यानंतर डायरेक्टरने थांब सांगितल्यावर सुद्धा विनोद खन्ना अभिनेत्री डिंपलला किस करत राहिले. 

 एकदा डिंपल कपाडियासोबत एका चित्रपटाच्या चुंबन दृश्याचे चित्रीकरण करताना त्यांचा संयम सुटला होता. विनोद खन्ना सोबत रोमँटिक सीन करायला अनेक अभिनेत्री घाबरत होत्या. विनोद खन्ना यांचा माधुरी दीक्षितसोबतचा दयावान चित्रपटातील किसिंग सीन सुद्धा इंडस्ट्रीत चर्चेत आला होता. पण ती काही पहिलीच वेळ नव्हती. विनोद खन्ना यांना डिंपल कपाडियासोबत इंटिमेट सीन चित्रित करताना संयम आवरता आला नव्हता. महेश भट्ट दिग्दर्शित 'मार्ग' या चित्रपटात विनोद आणि डिंपल यांच्यात एक किसिंग सीन चित्रित करण्यात येणार होता.

दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही डिंपल कपाडियाला विनोद खन्ना यांनी किस करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे डिंपल चांगलीच घाबरून गेली. कशीतरी स्वतःची सुटका करून मेकअप रूममध्ये जाऊन लपली. डिंपल त्यावेळी दिग्दर्शक महेश भट्ट यांचा खूप राग आला. विनोद खन्ना दारूच्या नशेत असल्याने कट समजू शकला नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, डिंपलला विनोदवर इतका राग नव्हता, जितका चित्रपटाच्या दिग्दर्शकावर होता. चार वर्षांनंतर 'प्रेम धरम' नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला, यानंतरही या अभिनेत्रीने विनोदसोबत अनेक चित्रपट केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group