तिला मासिक पाळी आली अन... तिने आत्महत्या केली की हत्या झाली? सासरच्यांचं कारस्थान ?
तिला मासिक पाळी आली अन... तिने आत्महत्या केली की हत्या झाली? सासरच्यांचं कारस्थान ?
img
दैनिक भ्रमर
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून अतिशय शुल्लक कारणावरूनही  मोठं मोठे आणि गंभीर गुन्हे घडत आहेत. दरम्यान आता अशुच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.काही दिवसांआधी जळगाव तालुक्यातील किनोद येथे गुरुवारी एका 26 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवल्याचं सांगण्यात आलं होतं. 

मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे विवाहितेनं आत्महत्या केली की हत्या झाली? यावरून संशय व्यक्त केला जात आहे.गायत्री ज्ञानेश्वर कोळी असं 26 वर्षीय मयत विवाहितेचं नाव आहे. 

 जळगाव तालुक्यातील किनोद इथं पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होत्या. पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर गायत्री शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. दरम्यान, गुरुवारी 1 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची माहिती गायत्रीच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे.

मयत गायत्री कोळीचा भाऊ सागर कोळी यांनी सांगितले की, "गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून घरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. घरात घडलेल्या वादानंतर तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता. पण वडील बाहेरगावी गेले होते. असं असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करत गायत्रीच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले", असा आरोप भावाने केला.

गायत्रीने गळफास घेतल्याचे समजल्यानंतर तिचे पती, सासू आणि नणंद फरार झाले होते. गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. ही आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. तसेच दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र त्यांनी घेतला. गायत्रीच्या पश्चात तिचे पती, मुलगा ध्रुव (वय 5), मुलगी नियती (वय 7) असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group