धक्कादायक! ४ मुलींवर ७ जणांकडून आळीपाळीनं सामूहिक अत्याचार ; कुठे घडली घटना?
धक्कादायक! ४ मुलींवर ७ जणांकडून आळीपाळीनं सामूहिक अत्याचार ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
माणुसकीला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील हट्टा पोलीस स्टेशन परिसरातून समोर येत आहे. तीन अल्पवयीन मुलींवर आणि एका तरूणीवर सात नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

२३ एप्रिल रोजी २ वाजेच्या सुमारास मुली एका लग्न समारंभातून परतत होत्या . त्यांच्यासोबत एक मुलगाही होता. त्या ठिकणी सात तरूण दोन दुचाकीवरून आले. नराधमांनी त्या मुलाला हाकलून लावले आणि मुलींना निर्जनस्थळी घेऊन गेले. तसेच आळीपाळीने सातही तरूणांनी ४ मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

पीडित मुलींनी त्यानंतर २४ एप्रिलला हट्टा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितांनी तक्रार दाखल करताच पोलीसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार केले.

अवघ्या तीन तासांत पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली. लोकेश मात्रे, लालचंद खरे, अज्जू बगदाते, अजेंद्र बहे, राजेंद्र कावरे, मणिराम बहे आणि या आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group