Nashik : सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Nashik : सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ही गोष्ट कोणाला सांगितली, तर मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांच्या मुलीचे आधी लग्न झाले होते. त्यातून तिला मुलगी झाली. काही दिवसांनंतर फिर्यादीची मुलगी कोणाला काही एक न सांगता मखमलाबाद येथील तिच्या पतीच्या घरातून निघून गेली. त्यानंतर फिर्यादीच्या मुलीने आरोपी सागर फुलारे (वय 27, रा. ओझर, ता. निफाड) याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. सागर फुलारे याच्यासोबत नांदत असताना फिर्यादीची मुलगी ही काही कामानिमित्त बाहेर गेली होती.

ही संधी साधून आरोपी सागर फुलारे याने अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तसेच ही बाब कोणाला सांगितली, तर वडील, आजी व आजोबा यांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. हा प्रकार ओझर येथे घडला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सागर फुलारे या सावत्र बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बयस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group