सारंगपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लीमाचौहान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात लग्नाच्या नावाखाली एका तरुणाला फसवण्यात आलं आहे, या तरुणाचं लग्न झालं, हनीमूनच्या रात्री या तरुणानं जेव्हा आपल्या बायकोच्या डोक्यावरचा पदर हटवला तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला, या तरुणाचं लग्न जमवताना त्याला जी तरुणी दाखवण्यात आली होती, त्या मुलीसोबत त्याचं लग्न झालंच नव्हतं, दुसऱ्याचं तरुणीसोबत त्यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
त्यानंतर वर पक्षानं यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासामध्ये तर आणखी धक्कादायक माहिती समोर आली. या तरुणाचं ज्या मुलीसोबत लग्न लावून देण्यात आलं होतं. तीचं यापूर्वीच लग्न झालेलं होतं.
मात्र पुन्हा एकदा या मुलीचं दुसरं लग्न आकरा लाख रुपयांच्या मोबदल्यात करण्यात आलं. ज्यामध्ये साडेपाच लाख रुपये या मुलीच्या वडिलांनी घेतले, तर साडेपाच लाख रुपये कालू सिंह नावाच्या मध्यस्थाला देण्यात आले.
चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. ही घटना सांरगपूर जिल्ह्यातल्या बूढ़नपूर गावात घडली आहे.
बूढ़नपूर गावात राहणारा तरुण कमल सिंह सोंधिया वय 22 याचं लग्न सुसनेर गावात राहणाऱ्या एका तरुणीसोबत निश्चित करण्यात आलं होतं. 14 एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात त्याचं लग्न पार पडलं. मात्र हनीमूनच्या रात्री या तरुणाला सत्य समोर येताच मोठा धक्का बसला.
याबाबत माहिती देताना तरुणाने पोलिसांना सांगितलं की, मी जेव्हा हनीमूनच्या रात्री रूमध्ये गेलो, तेव्हा माझी बायको फोनवर कोणाशी तरी बोलत होती. मी कमल आणि त्यांच्या कुटुंबाला झोपेच्या गोळ्या देणार आहे, त्यानंतर घरातील सगळे दागिने आणि पैसे घेऊन मी पळून जाईल, असं ती कोणाला तरी सांगत होती, असा दावा या तरुणानं केला आहे.
मला संशय आला म्हणून मी तिच्या डोक्यावरचा पदर वर केला तर तेव्हा मला धक्काच बसला कारण ही ती तरुणी नव्हती, जिच्यासोबत माझा विवाह निश्चित करण्यात आला होता. ही राधिका नव्हती तर या महिलेचं नाव सलोनी असल्याचं या तरुणानं म्हटलं आहे.