संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर मद्य पाजून अत्याचार, कुठे घडली घटना ?
संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर मद्य पाजून अत्याचार, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
दरदिवशी महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून आता  बेळगाव  येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

जबरदस्तीने मद्य पाजून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेला मुलीवर अत्याचार करुन मुख्य संशयित असलेला तिचा प्रियकर फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, औंरंगजेब नावाच्या 23 वर्षीय तरुणाचे एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी आपल्या एका मित्राला सोबत घेऊन तो पीडित मुलीच्या घरी गेला. तिला जबरदस्तीने मद्य पाजले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करुन औंरंगजेब फरार झाला. याआधीही तो वारंवार मुलीच्या घरी चाकू व इतर शस्त्रे घेऊन जाऊन तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. याप्रकरणी संशयिताला मदत करणार्‍या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. औंरंगजेब अद्याप फरार आहे.

याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group