भाडेतत्वावर पोकलेन मशीन घेत परस्पर विकून केली 48 लाखांची फसवणूक
भाडेतत्वावर पोकलेन मशीन घेत परस्पर विकून केली 48 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भाडेतत्त्वावर पोकलॅन मशीन घेऊन त्याचे भाड्याचे पैसे न देता उलट फिर्यादीकडून 54 हजार रुपये घेऊन पोकलॅन मशीन परस्पर इतर लोकांना देऊन 48 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अजित बाबू बिचकुले (रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचे स्वत:च्या मालकीचे ह्युंडाई कंपनीचे पोकलॅन मशीन आहे. आरोपी अमोल दिलीप मोरे व अजित दिलीप मोरे (दोघेही रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी बिचकुले यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्‍वास संपादन केला व त्यांचे पोकलॅन मशीन भाडेतत्त्वावर घेतले; मात्र फिर्यादीला पोकलॅन मशीनच्या भाड्याचे एकूण 16 लाख 15 हजार रुपये न देता उलट शासकीय बिल काढण्यासाठी फिर्यादीकडून 54 हजार रुपये घेतले.

त्यानंतर फिर्यादीच्या मालकीचे 32 लाख रुपये किमतीचे पोकलॅन मशीन परस्पर विजय पाटील व संतोष पाटील (रा. वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांना देऊन फिर्यादी बिचकुले यांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 22 जुलै 2024 ते 7 एप्रिल 2025 दरम्यान नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात घडला.

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मोरे बंधूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group