नाशिकच्या उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी; 70 तोळ्यांचे सोने-चांदी व डायमंडचे दागिने लंपास
नाशिकच्या उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी; 70 तोळ्यांचे सोने-चांदी व डायमंडचे दागिने लंपास
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरातील कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे लॅचलॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरातील कपाटात ठेवलेले 70 तोळ्याचे सोने-चांदी-डायमंडचे दागिने तसेच रोकड असा सुमारे 60 लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तिडके रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे तिडके रोडवरील नयनतारा सिटी वन सोसायटीत राहतात. दि. 5 ते 7 एप्रिल दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद असलेल्या फ्लॅटच्या लॅचलॉक कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला. यावेळी घरताील कपाटात ठेवलेले 7 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 3 लाख 82 हजार रुपये किंमतीचा 45 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचा हार, कर्णफुले, एक अंगठी, 2 लाख 25 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 45 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे हातातील फुले, 45 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंडचे मंगळसूत्र, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 63 हजार रुपये किंमतीचे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे दोन कर्णफुले, 90 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे हातातील सोन्याचे कडे, 90 हजार रुपये किंमतीच्या 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 45 हजार रुपये किंमतीच्या 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 4 लाख 95 हजार किंमतीचे 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील व कानातील हार व कर्णफुले, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचा 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मोतीचैन सेट, 90 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 45 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 27 हजार रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे लहान मुलाचे सोन्याचे कडे, 90 हजार रुपये किंमतीची 10 र्ग्रम वजनाची तीन पदरी चेन, 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 1 पेंडल, 10 ग्रॅम वजनाचे 1 लाख 35 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 18 हजार रुपये किंमतीच्या 2 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, 9 हजार रुपये किंमतीचा 1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का, 90 हजार रुपये किंमतीचा 10 ग्रॅम वजनाचा 2 पेंडल, 4 लाख  50 हजार रुपये किंमतीच्या 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 हार, 27 हजार रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे कानातले दागिने, 18 हजार रुपये किंमतीचे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, 81 हजार रुपये किंमतीचे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 300 रुपये किंमतीचे चांदीचे कडे व 5 हजार रुपयांची रोकड असा एकूण 59 लाख 85 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला.

याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ करीत आहे.

बिल्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
नयनतारा सिटी-1 मध्ये सुमारे 10 ते 15 बिल्डिंगचा समावेश असून, त्याच्या दोन्ही एन्ट्री गेटवर सुरक्षारक्षक तैनात असतात. बिल्डिंगच्या परिसरातदेखील सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एवढे सर्व असूनही गेटेड बिल्डिंगमध्ये मोठी घरफोडी झाल्याने या बिल्डिंगमधील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

घरातील सामान अस्ताव्यस्त न होताच फक्त ज्या ठिकाणी दागिने ठेवलेले होते, तेथेच चोरट्याने डल्ला मारल्याने ही चोरी ओळखीच्या व्यक्तीनेच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group