अहमदाबाद (भ्रमर वृत्तसेवा) : अहमदाबादमध्ये पोलीस हवालदार पतीची पत्नीने हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार आर्थिक अडचणीतून घडल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. यात घरगुती भांडणाच्या रागातून हा प्रकार घडला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मुकेश परमार असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तर, संगीता असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. मुकेश परमार हे अहमदाबाद शहरातील दानीलीमडा पोलीस लाइनमध्ये कॉन्स्टेबल पदावर होते. ते ए डिव्हीजन ट्रॅफिक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, मुकेश परमार आणि त्यांची पत्नी संगीता यांच्यात बर्यात काळापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते.
हे ही वाचा !
डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी या जोडप्यामध्ये भांडण झाले होते. या भांडणावेळी त्यांचा मुलगाही तेथे उपस्थित होते. संगीताने रागाच्या भरात मुकेशच्या डोक्यात काठी मारली. तसेच काठीने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संगीताने गळफास घेत आयुष्य संपवले. तपासात पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये भांडणाचे कारण आर्थिक समस्या असल्याचे नमूद केले आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, काल दुपारच्या सुमारास जोडप्यामध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. नंतर दोघांचा मृत्यू झाला. घरात उपस्थित असलेल्या मुलाने शेजार्यांना बोलावून घेतले. शेजार्यांनी पोलिसांना पाचारण केले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.