रायगड : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या तरुणाने बनावट व्हीआयपी पास तयार करून विकले. यातून लाखो रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. या प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या ओंकार महाडिक असे फसवणुक करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने हा गोरखधंदा केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान टोलनाक्यावर व्हीआयपींना टोल माफ आहे. यातूनच व्हीआयपी पास तयार करून त्या विक्री करण्याचे काम ओंकार याने केले आहे. यातून त्याने अनेकांना पास विक्री करून पैसे कमविले.
दरम्यान टोलनाक्या वरून मोफत व्हीआयपी पासवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती. याचा येथील अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता काही वाहन चालकांकडील पास बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
यावेळी टोल नाका प्रशासनाने याचा तपास केला असता यात ओंकार महाडिक याचं नाव समोर आले असता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापुर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.