सध्या सोशल मीडिया वर 'घिबली' चा ट्रेंड जोरदार सुरु असून सर्वच जण या ट्रेंड ला फॉलो करतआहेत आहेत. सामान्यांपासून ते रजकारणी, सेलिब्रेटी, लहान - मोठे सर्वच जण या ट्रेंड चे दिवाने झाले आहते. परंतु हाच ट्रेंड मात्र काही लोकांसाठी मात्र डोकेदुखी ठरला आहे. या घिबलीचा वापर करत सायबर चोरांनी मोठा घपला केला आहे. घिबल ट्रेंडचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. ज्यामुळे अनेक लोकांच्या बँक खात्यांमधील कष्टाच्या कमाईची रक्कम गायब झाली.
तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेकदा मजेशीर ट्रेंड सुरू होतात. त्यातूनच घिबली हा ट्रेंड सुरू झाला. यामध्ये घिबली स्टाईलने फोटो तयार करण्यासाठी अनेक जण फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवर आलेल्या लिंक ओपन करतात. या लिंक क्लिक करताच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक अडकतात.
सायबर गुन्हेगारांनी "मेक अ घिबली फोटो" याची लिंक पाठवून नागरिकांना फसवणे सुरू केले आहे. या लिंकवर क्लिक करताच, त्यांना बँक खात्याची आणि मोबाइल फोन माहिती विचारली जाते. अनेक जण या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले. या युजर्सच्या बँक खात्यातून थोड्या वेळातच पैसे गायब होण्याच्या तक्रारी नागपूर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.
फेसबुक, व्हाट्सअप, यूट्यूब, आणि इंस्टाग्रामवर पसरलेली ही लिंक नागरिकांना आकर्षित करत आहे, आणि अनेक जण त्यात फसून खात्यातून पैसे गमावत आहेत. यामध्ये केवळ बँक खात्याची माहिती नाही, तर काही घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी मोबाईल नंबर हॅक करून खात्यातून पैसे काढण्याचे काम केले आहे.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याची सूचना दिली आहे. "कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, आणि बँक खात्याची संवेदनशील माहिती कुणाला देखील देऊ नका," असे पोलिसांनी म्हटले आहे. सायबर गुन्हेगारांचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.