मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला अखेर अटक, तेलंगणातून ठोकल्या बेड्या
मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला अखेर अटक, तेलंगणातून ठोकल्या बेड्या
img
Dipali Ghadwaje
मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर पोलीस लवकरच याबाबत माहिती देण्याची शक्यता आहेत.  

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव केलं होतं, त्यानंतर तो फरार झाला होता, अखेर त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group