धक्कादायक  ! खाणीत सापडला 8 वर्षांच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह, कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! खाणीत सापडला 8 वर्षांच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर

लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. तसेच या अपहरणांमधून अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशाच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. 8 वर्षांच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह खाणीत सापडला असल्याची घटना घडली आहे. 

जेवण आणण्यासाठी घरामधून बाहेर निघालेला 8 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता, या मुलाचा मृतदेह मिळाल्यामुळे खळबळ माजली आहे. या मुलाचा मृतदेह गावामधल्या एका तलावाजवळ असलेल्या खाणीमध्ये सापडला आहे. पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांना रविवारी भिवंडीच्या वरहलदेवी तलावाजवळच्या एका खाणीमध्ये लहान मुलाचा मृतदेह मिळाला होता, यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलाच्या डोक्यावर जखमा आहेत, तसंच त्याच्या तोंडातून फेस येत होता, असा दावा मुलाच्या पालकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने जेवण विकत घेण्यासाठी त्याच्या आजोबांकडून पैसे घेतले, यानंतर तो घराबाहेर पडला पण त्यानंतर घरी परतलाच नाही. यानंतर कुटुंबाच्या सदस्यांनी आसपासच्या भागात मुलाचा शोध घेतला, पण त्यांना मुलगा सापडला नाही. यानंतर मुलाच्या पालकांनी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.

अज्ञात व्यक्तींकडून मुलाचं अपहरण झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला. यानंतर रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खाणीमध्ये मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मुलाच्या मृत्यूचं कारण समोर येईल आणि त्यानंतरच पुढच्या तपासाला दिशा मिळेल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group