धक्कादायक ! 22 दिवसांच्या बाळाच्या छाती-पोटावर गरम विळ्याचे 65 चटके, कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! 22 दिवसांच्या बाळाच्या छाती-पोटावर गरम विळ्याचे 65 चटके, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
अंधश्रेद्धेचे प्रमाण  दिवसेंदिवस वाढत चालले असून या अंधश्रद्धेतून अनेक धक्कयाक आणि गंभीर घटना घडल्याचे उघडकीस येत आहे. दरम्यान अशीच एक घहटन समोर आली आहे. 22 दिवसांच्या बाळाला आनंद देण्याऐवजी अंधश्रद्धेचा बळी होऊन मरणयातना दिल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात पुन्हा एकदा घडली. हा लाजीरवाणा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात घडला आहे.

या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. 22 दिवसांच्या नवजात बाळाला अक्षरश: गरम विळ्याचे चटके देण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून अंधश्रद्धेचा भयानक प्रकार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात अवघ्या २२ दिवसांच्या बाळाला घरगुती उपाय म्हणून गरम केलेल्या विळ्याचे तब्बल 65 चटके देण्यात आले.

या धक्कादायक घटनेनंतर बाळाची प्रकृती खालवली असून त्याच्यावर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिमोरी गावातील या नवजात बाळाला आजार झाला होता. मात्र, वैद्यकीय उपचारांऐवजी नातेवाईकांनी अंधश्रद्धेला बळी पडत बाळाला गरम विळ्याने चटके देण्याचा अमानुष प्रकार केला. बाळाची प्रकृती झपाट्याने खालावल्याने त्याला प्रथम हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या धक्कादायक घटनेने मेळघाटात आरोग्य सुविधा आणि जनजागृतीचा अभाव अधोरेखित झाला आहे. आजही अनेक आदिवासी भागात अंधश्रद्धा खोलवर रुजलेली असून त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने गावात आरोग्य शिबीर आयोजित करून जनजागृती करण्याची गरज आहे. अंधश्रद्धेला बळी पडून या नवजात बाळाला मरणयातना दिल्या. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group