धक्कादायक घटना : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून  शेतकऱ्याने संपवले जीवन , दोघांना अटक , कुठे घडली घटना?
धक्कादायक घटना : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन , दोघांना अटक , कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
गोकुळ शिरगांव : हलसवडे  येथील नागोंडा शंकर पाटील (वय ५२) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , खासगी सावकाराच्या त्रासाला, हातउसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचा आरोप पाटील यांच्या नातेवाइकांनी केला आहे. नागोंडा पाटील यांच्याकडे पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत दोघांच्या नावासह आर्थिक घेवाण-घेवाणीचा उल्लेख आहे. 

त्यामुळे गोकुळ शिरगांव पोलिसांनी या प्रकरणी बाबासाे पारिसा लबाजे (वय ८२, कसबा सांगाव, ता. कागल), मधू मगदूम (वय ५२, पिंपळगाव खुर्द, ता़ कागल) यांना अटक केली.

नागोंडा पाटील यांचा ट्रॅक्टर असून, साखर कारखान्यांसाठी उसाची वाहतूक करण्याबरोबरच ते शेतीच्या मशागतीची कामे करत होते. त्यांनी २२ जुलै २०२२ मध्ये खासगी सावकार बाबासो लबाजे यांच्याकडून दरमहा २ टक्के व्याजदराने साडेपाच लाख रुपये घेतले होते. तसेच तारण म्हणून १९ गुंठे शेती लबाजे यांना लिहून दिली होती. 

कर्ज आणि व्याजाचे असे सहा लाख ६० हजार रुपये लबाजे यांना देण्यासाठी पाटील गेले होते. यावेळी त्यांनी दिलेल्या रकमेवर दरमहा ४ टक्के व्याजदराची आकारणी करत २९ लाख रुपयांची मागणी लबाजे यांनी केली.

मधू मगदूम यांना अडीच लाख रुपये हातउसने दिले होते. वारंवार मागणी करूनही मगदूम याने ही रक्कम परत दिली नाही. कर्जाच्या वसुलीकरिता सावकाराने लावलेल्या तगाद्यामुळे पाटील यांनी आत्महत्या केली.

याप्रकरणी मुलगा आकाश नागोंडा पाटील यांनी गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित लबाजे, मगदूम यांना अटक केली. तपास सपोनि तबरसूम मगदूम करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group