भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर याचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी स्वत:च्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , विभागीय अधिकाऱ्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी गुरू चिचकर यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात गुरू चिचकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू चिचकर हे नवीन चिचकर यांचे वडील आहेत. नवीन चिचकर हा मोस्ट वॉन्टेड असून, ड्रग सिंडिकेटचा प्रमुख आहे.
नवीन चिचकर सध्या देश सोडून पळून गेला आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरू आपला ड्रग्जचा व्यवसाय देशाबाहेरून चालवतो. सध्या एनसीबी पथकही नवीन चिचकराच्या शोधात आहेत.
गुरू चिचकरांनी आत्महत्या का केली?
गुरू चिचकर यांनी सकाळी राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येसाठी त्यांनी 9 MM गोळीच्या पिस्तूलाचा वापर केला. गुरू चिचकर यांनी आत्महत्या मानसिक दबाव आणि त्यांच्या मुलाच्या गुन्ह्यांमुळे होणारा ताण यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.