महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली असून आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
सुरुवातीला बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल, असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर हा निकाल १५ तारखेचा आत लागेल, असं सांगण्यात येत होतं. मात्र आता थेट निकालाची तारीखच समोर आली आहे.उद्या सोमवारी ५ मे ला बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. उद्या सकाळी बोर्डाकडून बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
विद्यार्थ्यांना कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल?
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com