धक्कादायक !  पतीसह सासरच्याकडून शिक्षिकेचा जातीवाचक छळ
धक्कादायक ! पतीसह सासरच्याकडून शिक्षिकेचा जातीवाचक छळ
img
दैनिक भ्रमर
महिलांवरील होणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अनेकदा महिलेचा हुंड्यावरून तसेच अनेक कारणांवरुन सासरच्यांकडून छळ  केला जातो. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा पतीसह सासरच्यांकडून जातीवाचक छळ होत असल्याची घटना समोर आलाय आहे. 

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार उघडाकीस आला आहे. इथं एका शिक्षिकेचा तिच्या सासरच्यांनी जातीवाचक छळ केला आहे. आरोपी मागील काही महिन्यांपासून पीडितेचा छळ करत होते. शिवाय अनेकदा चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण देखील करण्यात येत होती. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीनुसार, पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह मारहाण आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला डोंबिवली परिसरात आपला पती आणि सासू-सासऱ्यांसह राहते. ती डोंबिवली परिसरातील एका नामवंत शाळेत शिक्षिका आणि उपमुख्याध्यापिका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेनं सहा वर्षांपूर्वी आरोपीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सासरच्यांचा या विवाहाला विरोध होता. मात्र नंतरच्या काळात हा विरोध मावळला. पण गेल्या काही दिवसांपासून चारित्र्यावर संशय घेणे, मारहाण करणे, अशाप्रकारचा छळ सुरूच राहिला. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group