बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुणाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लेकाच्या अशा अचानक जाण्याने आईला अतिशय दु:ख झालं. तिला आपल्या मुलाचा विरह सहन होत नव्हता. लेकाच्या जाण्याने कोलमडलेल्या आईनेही प्रचंड दुःखातून आत्महत्येचा मार्ग पत्करला. लेक आणि आई या दोघांच्या एकामागे एक आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. माय-लेकाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
अभिमान खेत्रे (वय ६) या तरुणाने गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला इथे काल सोमवारी, २८ एप्रिल रोजी दुपारी फाशी घेत आपलं जीवन संपवलं. ही माहिती आई कौशल्या भागुजी खेत्रे (वय ७०) यांना कळताच त्या प्रचंड मानसिक तणावात गेल्या. त्यांनीही काही वेळातच विषारी औषध सेवन केलं आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला.
अभिमानचा मृत्यू सोमवारी सायंकाळी ४ वाजता झाला. तर आई कौशल्याबाईंचा मृत्यू आज मंगळवारी, २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता झाला. कौशल्या बाई यांनी विषारी औषध सेवन केल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचं मृत्यू झाला.
एका घरात लागोपाठ एकामागे एक असे दोन दिवस एकाच वेळी माय - लेकाचा दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नातेवाईक, शेजारी आणि गावकरी मोठ्या दुःखात आहेत. मात्र तरुणाने नेमकी आत्महत्या का केली, त्याच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.