पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यांनतर भारत पाकिस्तान तणाव वाढला असून भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. याच पार्शवभूमीवर आता केंद्र सरकारने युद्धसरावाचा निर्णय घेतला असून सामान्य नागरिकांसाठी मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. यामाध्यमातून युद्ध स्तिथीत नागरिकांनी नेमके काय करावे याचा सर्व दिला जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत शत्रूने हल्ला केल्यास स्वत:चा बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. दरम्यान, आता नागरिकही मॉक ड्रिलच्या माध्यमातून सज्ज होत आहे. उद्या राज्यात दुपारी चार वाजता मॉकड्रिल घेतलं जाणार आहे.
राज्यातल्या मॉक ड्रिलच्या ठिकाणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी, थळ वायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. या मॉक ड्रिलची जोरदार तयारीही सुरू आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी उद्या दुपारी 4 वाजता होणार मॉक ड्रिल होणार आहे.
देशात 244 महत्त्वाच्या ठिकाणी सिविल डिफेन्स मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत शत्रूने हल्ला केल्यास स्वत:चा बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. देशात शेवटची मॉक ड्रिल 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी झालं होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याने सिविल डिफेन्स मॉक ड्रील केलं जात आहे. हे मॉक ड्रील करण्यामागचा दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शत्रू राष्ट्राला आम्ही कुठल्याही परिस्थितीसाठी तयार आहोत असा थेट संदेश मानला जातो.
मॉक ड्रील किंवा युद्धजन्य पररिस्थितीत सायरन वाजल्यावर नेमकं काय करायचं?
सायरन वाजल्यानंतर घाबरू नका
तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावं
मोकळ्या जागेपासून लांब राहा
घर किंवा भक्कम इमारतीत आश्रय घ्या
टीव्ही, रेडिओ, सरकारच्या सूचनांवर लक्ष द्या
अफवांवर विश्वास ठेवू नका
प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा
रात्रीच्या वेळी परिसरातील लाईट्स बंद ठेवा
घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा