‘अबीर गुलाल’ फेम फवाद खानने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला निषेध,  म्हणाला..
‘अबीर गुलाल’ फेम फवाद खानने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला निषेध, म्हणाला..
img
दैनिक भ्रमर
पहलगाम येथील हल्ल्याचा बदल म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले असून यामाफर्त पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतानं मध्यरात्रीच्या सुमारास सर्जिकल स्ट्राईक केला. दहशतवाद्यांचे एकूण 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान आता या स्ट्राईक वरून पाकिस्तानी कलाकारांच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत.हानिया आमिर, माहिरा खान यांसारख्या पाकिस्तानी अभिनेत्रींनंतर आता फवाद खानने सोशल मीडियाद्वारे भारताबद्दल संतापजनक शब्द वापरले आहे. भारताने केलेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असं म्हटलंय.फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार होता. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर भारतात थेट बंदी घालण्यात आली. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होता.

फवाद खानची पोस्ट-
‘या लज्जास्पद हल्ल्यात प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबीयांसाठी मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो. माझी सर्वांना आदरयुक्त विनंती आहे, गोंधळ उडवणाऱ्या शब्दांनी आग पेटवणं थांबवा. निष्पाप लोकांच्या जीवाच्या किंमतीवर तरी नाही. सर्वांना सदबुद्धी मिळो, इन्शाल्लाह. पाकिस्तान जिंदाबाद’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर याच पाकिस्तानी कलाकारांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. आता पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने एअर-स्ट्राइक केल्यावर पाकिस्तानी कलाकारांनी भारतावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group