राजकारणातील घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी आणविरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान आता शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मला असं वाटतं की, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत, विशेषत: जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांना वारवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत, किंवा ते तशाप्रकारचं वक्तव्य नेहमी करत असतात. मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरच्या ज्या कमेंट आहेत, तशा कमेंट करणं योग्य नाहीये, त्यांनी देखील मर्यादा पाळायला पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.