ठाकरे गटाला मोठा धक्का !   ''या''  शिलेदाराने ठोकला रामराम, विधानसभेत मिळवले होते 1 लाख मतं
ठाकरे गटाला मोठा धक्का ! ''या'' शिलेदाराने ठोकला रामराम, विधानसभेत मिळवले होते 1 लाख मतं
img
दैनिक भ्रमर
विधासभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले असून महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला. दरम्यान,  विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला  मात्र गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरातील पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा राजीनामा सादर केला आहे. राजू शिंदे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राजू शिंदे यांनी राजीनामा पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या सततच्या हस्तक्षेपांमुळे आणि त्यांच्या वागणुकीमुळे मी राजीनामा देत असल्याचे राजू शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. राजू शिंदे यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group