एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना बुलढाण्यातून अटक
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना बुलढाण्यातून अटक
img
दैनिक भ्रमर
एक महत्वाची बातमी समोर येत आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्यासाठी धमकी देण्यात आली होती. दोन तरुणांनी ई-मेलद्वारे शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. एकनाथ शिंदे यांची मोटार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती अखेरीस पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन जणांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय मंगेश अच्युतराव वायाळ आणि 22 वर्षीय अभय गजानन शिंगणे असं या आरोपींची नावं आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव इथं मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे.विशेष म्हणजे, हे दोघेही नात्याने आते-माम भाऊ आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group