नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत माझा पक्षप्रवेश रोखला होता, ठाकरे गटाच्या ''या'' महिला नेत्याचा आरोप
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत माझा पक्षप्रवेश रोखला होता, ठाकरे गटाच्या ''या'' महिला नेत्याचा आरोप
img
दैनिक भ्रमर
राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेत एक मर्सिडीज दिली की एक पद मिळायचे, असे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना पुणे शाखेच्या वतीने गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. दरम्यान आता  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  

नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली. नंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ईमानदारी, प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी बेइमानी केली. पवार साहेबांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेइमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर केल्या.

तसेच , लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हे त्यांनी केलं. २०१७ ते २०२२ पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही, असा सनसनाटी आरोप अंधारे यांनी केला.

ठाकरेंच्या शिवसेनेत एक मर्सिडीज दिली की एक पद मिळायचे, असे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना पुणे शाखेच्या वतीने गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या.

उद्धव ठाकरे यांना २ मर्सिडीज दिल्या की पद मिळते असे जर त्या म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या २ मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांची २५० करोडची मालमत्ता कुठून आणली. त्यांचे बँक डिटेल्स तपासण्याची वेळ आली आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

शिवसेनेवर बोलण्याचा प्रयत्न अतिशय केविळवाणा आहे. गोऱ्हे यांच्यासारखा व्यक्तीला पैशाची किंमत नाही. त्यांनी अनेक पदं भूषवली म्हणजेच अनेक मर्सिडीजची किंमत त्यात होते. हा अब्रू नुकसानीचा दावा किती असेल, त्याची रक्कम किती असेल हे संध्याकाळपर्यंत कळवले जाईल. परंतु शिवसेना त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही अंधारे यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group