मोठी बातमी !  भाजपच्या ''या''  महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी ! भाजपच्या ''या'' महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी
img
दैनिक भ्रमर
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीच पत्र मिळाले आहे.  भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.या पत्रानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.

‘तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती,’ असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महालेंनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणात आमदार महाले दुपारी आपल्या कार्यकर्त्यांह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणार आहेत .

यावर प्रतिक्रिया देताना महाले यांनी म्हटलं की. मी या प्रकरणात तक्रार दाखल करणार आहे. पोलिसांनी अशा लोकांन समोर आणून त्यांचा बुरखा फाडावा . दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा या पत्रातील मजकूर आहे. समाजात तेढ  निर्माण करणाऱ्या समाज कंठकांचा बुरखा फाटला पाहिजे.  त्यांच्यांविरोधा कडक कारवाई झाली पाहिजे.  धमकी देणाऱ्या लोकांविरोधात सरकारने पाऊल उचललं पाहिजे.

तसेच पुढे त्या म्हणाल्या मागच्या काळात माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे झाली. काँग्रेसच्या काळात एवढी विकास कामे कधी झालीच नाहीत. आम्ही कधी जाती भेद केला नाही, निवडणुकीत काँग्रेसने धर्माचे राजकारण केले . त्याचा राग ठेऊन हे धमकीचं पत्र मला आलं आहे.  मौलवी सांगतात तसे डोक्यात ठेवल्या जाते. मला माझ्या मतदारसंघात सुरक्षेची काही गरज नाही, असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group