राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीवर मोठे यश संपादन केले असून महाविकस आघडीचा दारुण प्रभाव झाला. दरम्यान त्या नंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान आता राजकीरय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला आहे. पुण्यातील सर्किट हाऊसपासून ते कौन्सिल हॉलपर्यंत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला आहे. उत्तम जानकर यांच्यासोबत यावेळी उमेश पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार, उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांची जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली. उत्तम जानकर यांची अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे, मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी म्हटलं आहे की, उजनी धरणातून माळशिरस तालुक्यात पंधरा दिवस अगोदर पाणी सोडावे, अशी जानकर यांची मागणी आहे. यासाठीच भेट घ्यायाची होती, मात्र दादांकडे गर्दी असल्यामुळे दादा म्हणाले गाडीत बसून बोलू, दादा मला आणि उत्तमराव जानकर यांना म्हणाले गाडीत बसा आपण गाडीत बोलूया, असं पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली, दोघांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला. दहा मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.