मोठी बातमी ! अजित  पवारांकडून  काँग्रेसला मोठा धक्का, दोन बडे नेते गळाला
मोठी बातमी ! अजित पवारांकडून काँग्रेसला मोठा धक्का, दोन बडे नेते गळाला
img
दैनिक भ्रमर
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीला गळती लागली असून, महाविकास आघाडीतील पक्षांतील अनेक नेत्यांनी महायुती मध्ये प्रवेश केला आहे. 

दरम्यान,  आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन बडे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 23 मार्च रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर आता हा आणखी एक मोठा झटका काँग्रेसला बसणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group