"सध्याचं सरकार झोपलेलं सरकार, सुस्त सरकार आहे" ; विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
img
Dipali Ghadwaje
मंत्रालयात व्यापारी, बिल्डर यांच्या चकरा वाढल्या आहेत. बिल्डर डेव्हलपर्ससाठी मंत्रालय झालंय. यंत्रणेवर कोणाचाही धाक राहिला नाहीये. भ्रष्टाचार वाढला असून कोणताही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर केलाय.

नेमकं काय म्हणाले  विजय वडेट्टीवार ?
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करून मते घेतली आहेत. बेईमान लोक खुर्चीवर बसलेत. सरकार शेतकरी, सामान्य माणूस यांचं काही देणंघेणं नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी सरकारमधील नेत्यांमध्ये विसंगती निर्माण झाली होती. ते एकमेकांच्या फाईल अडवत होते. नेत्यांच्या विसंगतीमुळे विकासकामांवर परिणाम होणार होता. पण आता उशिरा का होईना, सरकारला शहाणपण सुचलंय.

सरकारमधील नेते ज्यांच्याकडे फाईल गेली की, ते त्यांच्या उशीखाली दाबून ठेवत. पण लोकांच्या बोंबाबोंब झाली, त्यानंतर आता फाईलचा प्रवास वाढलाय. पण त्यात पारदर्शकता दिसावी, अशी अपेक्षा करूया, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 
 
सध्याचं सरकार झोपलेलं सरकार, सुस्त सरकार आहे.  राज्य सरकार वाईट आणि दयनीय परिस्थिती आहे. नवीन नवीन मुद्दे शोधत आहे, जेणेकरून यांच्याकडे लक्ष जाईल. सरकारजवळ पैसेच नाहीत. पैसे दिल्याचं दाखवलं. पण त्यांच्या बँक खात्यातून लगेच पैसे काढून घेतले. शेतकऱ्यांची फसवणूक करून या सरकारने मते घेतली. बेईमान लोक खुर्चीवर बसले आहेत.

सरकार शेतकरी,सामान्य माणूस यांचं काही देणंघेणं नाहीये. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं महायुती सरकारने निवडणुकीच्यावेळी अश्वासन दिलं होतं. परंतु सरकारने आता त्यापासून त्यांनी घुमजाव केलं.

आता शेतकरीही घुमजाव करतील असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी मारलाय. पण गेल्या काही दिवसात मंत्रालयात व्यापारी,बिल्डर यांच्या चकरा वाढल्या आहेत. भ्रष्टाचार वाढलाय. कोणताही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीये. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करा, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group