अभिनेत्री भाग्यश्री खेळताना जखमी; कपाळावर पडले 13 टाके
अभिनेत्री भाग्यश्री खेळताना जखमी; कपाळावर पडले 13 टाके
img
दैनिक भ्रमर

मुंबई :- अभिनेत्री भाग्यश्रीला खेळादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

पिकलबॉल खेळताना भाग्यश्रीचा अपघात झाला. त्यामुळे तिच्या कपाळावर जखम झाली आहे. भाग्यश्रीचे रुग्णालयातील काही फोटो समोर आले आहेत.

अभिनेत्री भाग्यश्रीचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यात ती रुग्णालयातील बेडवर दिसत आहे. तिच्या कपाळावर गंभीर जखम दिसत आहे. 

भाग्यश्रीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिला १३ टाके पडले आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. भाग्यश्रीचे फोटो पाहून ती लवकर बरी व्हावी अशा कमेंट्स चाहते करत आहेत.

भाग्यश्रीचे सेल्फी समोर आले आहेत, ज्यात तिच्या कपाळावरील जखम दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली दिसत आहे. दरम्यान, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group