मुंबई नाशिक महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून, अशातच मुंबई नाशिक महामार्गावर अवघ्या १० किलोमीटरच्या अंतरावर २ भीषण अपघात घडले आहेत. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पहिला अपघात शहापूर तालुक्यात घडला. महामार्गावर पायी चालणाऱ्या २ व्यक्तींना एका कारने जोरदार धडक दिली. तर, दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वाराला चिरडले. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही अपघातानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार , पहिला अपघात शहापूर तालुक्यातील एका गावात घडला. महामार्गावर पायी चालणाऱ्या २ व्यक्तींना एका कारने जोरदार धडक दिली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालक झोपेत असल्याचा अंदाज आहे. या भीषण कार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत एका व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले तर, गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर रूग्णलयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दुसरा भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकने एका मोटारसायकलस्वाराला चिरडले.
या दुर्घटनेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नंतर ट्रक चालक फरार झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस या दोन्ही अपघातांचा तपास करीत असून, संबंधित चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.