संतापजनक ! पोलीस उपनिरीक्षकाचा पोलीस महिलेवर लैंगिक अत्याचार,नग्न फोटो अन.. कुठे घडली घटना ?
संतापजनक ! पोलीस उपनिरीक्षकाचा पोलीस महिलेवर लैंगिक अत्याचार,नग्न फोटो अन.. कुठे घडली घटना ?
img
DB
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून आजची महिला कुठेही कुठेही सुरक्षित नाही. आपण पोलिसांमुळे स्वतःला सुरक्षित समजतो, पोलीस म्हंटल कि आपल्यासोबत कोणतेही वाईट कर्त्या घडू शकत नाही याचा विश्वास आपल्याला असतो. पण एका पोलीस महिलेसाठी एक पोलीस उपनिरीक्षक हा नराधम ठरला आहे. 

पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस महिलेसोबत  धक्कादायक कृत्य केले आहे. या पोलिस उपनिरीक्षकाने या महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचे नग्न फोटो देखील काढले. या प्रकरणी पोलिस उपनिकीक्षकासह त्याच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. 

नवी मुंबईतील पनवेलमध्ये महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचे औषधं देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकारणी पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2020 साली नेरे येथे महिला पोलीसवर गुंगीचे औषधं टाकून लैंगिक अत्याचार करुन अर्धनग्न फोटो देखील काढून ठेवण्यात आले होते. सदर फोटो वायरल करण्याची धमकी देत तसेच लग्नाचे आमिष दाखवत मागील पाच वर्षांपासून आरोपी पोलीस उपनिरीक्षक जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group