लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होईल, तरीही अद्याप मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत लाडक्या बहिणींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
मे महिना संपायला फक्त १ आठवडा उरला आहे. त्यामुळे याच एका आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून महिना अखेरला पैसे जमा केले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातही तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, अशी आशा आहे.

दरम्यान महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे या फसवणूकीच्या घटना घडणार नाही. लाडकी बहीण योजनेत पुन्हा महिलांच्या अर्जांची पडताळणी करुन निकषाबाहेर असणाऱ्या महिलांची नावे बाद केली जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलाच पात्र आहेत. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घरी चारचाकी वाहन नसावे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.