कल्याण : कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौक परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारा अपघात घडला आहे. या अपघातात
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार , मुलगी व वडील थोडक्यात बचावले असून दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौक परिसरात आज सकाळी हा अपघात झाला आहे. या अपघातात दहा चाकी खतांच्या गोण्यांनी भरलेला ट्रक कल्याणच्या दिशेने येत होता. याच दरम्यान समोरून एका दुचाकीवर वडील आणि मुलगी येत होते. मात्र अचानक दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी ट्रकच्या खाली आली. यामुळे वडील आणि मुलगी दोन्ही ट्रकच्या टायर खाली आले.
दुचाकी थेट ट्रक खाली गेल्यानंतर ट्रक चालकाने लागलीच ट्रक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र चाकाखाली सापडल्याने या दोघांच्याही डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
मनोहर तांबे असे वडिलांचे तर मुलगी प्रज्ञा तांबे अशी दोघांची नावे आहेत. दोघेही भिवंडीला राहणारे होते कामानिमित्त ते कल्याण मध्ये आले होते. दोघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात घडल्यानंतर पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सदर अपघात प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी ट्रकच्या ड्रायव्हरला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.