अंबरनाथ : राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोन गोळ्या झाडून दुचाकीवरून झालेले हल्लेखोर पसार झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिक पनवेलकर यांच्या घरावर सोमवारी दुपारी अडीच वाजता गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोघांनी गोळ्या झाडून पळ काढलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. पनवेलकर यांच्या घराबाहेर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले.
त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला. गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गोळीबाराची संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस आणि क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान अंबरनाथमध्ये या गोळीबाराच्या घटनेनंतर आता कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.