महत्वाची बातमी : राज्यात अवकाळी पावसाचा इशारा ;
महत्वाची बातमी : राज्यात अवकाळी पावसाचा इशारा ; "या" जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
img
Dipali Ghadwaje
राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना , दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. केरळ  आणि दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , आज आणि पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना धोका?

हवामान खात्याने कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. आज, ३१ मार्च रोजी, (सिंधुदुर्ग  , ठाणे , पालघर , धुळे , नंदुरबार  , नाशिक , अहिल्यानगर , सातारा , सांगली आणि कोल्हापूर  ) या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, रायगड , रत्नागिरी , मुंबई , जळगाव , सोलापूर , पुणे , छत्रपती संभाजीनगर , धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पूर्व-मोसमी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर, उद्या (१ एप्रिल २०२५) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group