राजकीय ! विधानसभेच्या  विरोधी पक्षनेतेपदी  ठाकरे गटाच्या ''या'' नेत्याची वर्णी
राजकीय ! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गटाच्या ''या'' नेत्याची वर्णी
img
दैनिक भ्रमर
राज्यातील  विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार का? याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भास्कर जाधव हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केला असून तशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात येणार आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभा अध्यक्षांकडे महाविकास आघाडीचे पत्र पोहोचलं असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेले. यावेळी आदित्य ठाकरेंसोबत भास्कर जाधव, सचिन अहिर, अंबादास दानवे व इतर नेते उपस्थित होते.

दरम्यान, विधानसभा विरोधी पक्ष नेता पदासाठी महाविकास आघाडीचा अडीच अडीच वर्षाचा फॅार्म्युला फायनल झाला आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं अशी मागणी काँग्रेसने केल्याची माहिती आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसकडे जाणार आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेता पद शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना अडीच अडीच वर्ष विभागून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेतेपद अडीच अडीच वर्ष राहाव, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे,


इतर बातम्या
Join Whatsapp Group