राज्यात अनेक मुद्यांवरून अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान आता मुघल सम्राट औरंगजेब याच्या कबरीवरून देखील अनेक वाद निर्माण झाले आहेत. राज्यातील राजकारणातही यावरून अनेक आरोप प्रत्यारोप आणि वाद विवाद निर्माण झाले आहेत. दरम्यान आता यावरून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुघल सम्राट औरंगजेब याची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्दाबाद येथे स्थित आहे. सध्या या कबरीबाबत अनेक वाद निर्माण झाले आहेत. काही लोकांची ही कबर हटवण्याची मागणी आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सोमवारी त्यांनी औरंगजेबाची कबर हे एक संरक्षित स्थळ आहे, मात्र त्याचे कोणत्याही प्रकारचे उद्दात्तीकरण होऊ देणार नाही, असे सांगितले. त्यांनी नमूद केले की, ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत संरक्षित स्थळ आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्यानंतरच ती हलवता येते. कोणाला औरंगजेब आवडो किंवा न आवडो, कायद्याने या कबरीला संरक्षण मिळाले आहे व हे एक संरक्षित स्मारक आहे आणि ती हटवण्याची परवानगी नाही. आम्हाला कायद्याचे पालन करावे लागेल. मात्र त्याचे उद्दात्तीकरण होता कामा नये.
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शने केली. मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये निदर्शने करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटांनी इशारा दिला की, जर राज्य सरकारने कारवाई केली नाही तर ते प्रकरण स्वतःच्या हातात घेतील आणि कबर स्वतः पाडतील.