काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या "त्या" विधानामुळे राजकरणात खळबळ ; नेमकं काय म्हणाले...? वाचा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी अस्तित्वात आलेल्या इंडिया आघाडीत निवडणुका संपताच टोकाचे वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले होते. दिल्ली विधानसभा निवडणुपूर्वी या आघाडीतील वाद हे शिगेला पोहोचले होते.

इंडिया आघाडीत सामील असलेल्या विविध राज्यातील पक्षांनी या आघाडीच्या नियमित बैठका व्हायला हव्या , एकत्रित कार्यक्रम देशभर राबवायला हवा अशी मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुका संपल्यानंतर ही आघाडी विस्कळीत झाल्याचे दिसू लागले होते.

काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी या आघाडीबाबत एक मोठे विधान केले आहे.

ही आघाडी अद्याप आहे की नाही हे माहिती नाही असे त्यांनी म्हटले. कोणतीही आघाडी ही निवडणुकीच्या काळात तयार होत नसते ती दोन निवडणुकांदरम्यानच्या  काळात वाढवावी लागत असते असे चिदंबरम यांनी गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले होते. याच कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, मला माहिती नाही की इंडिया आघाडी ही शाबूत आहे की नाही.   

गुरुवारी दिल्लीमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना चिदंबरम यांनी म्हटले की, इंडिया आघाडी शाबूत आहे की नाही मला माहिती नाही, कदाचित सलमान खुर्शिद यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

सलमान खुर्शिद हे इंडिया आघाडीच्या चर्चांमध्ये सामील असल्याने त्यांना याबाबत अधिक माहिती असेल असे चिदंबरम यांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की इंडिया आघाडी ही शाबूत असेल तर मला त्याचा आनंद होईल पण मला असे दिसते आहे की ही आघाडी अत्यंत कमजोर झाली आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group