राज्यातील घडामोडींना वेग आला असून विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये आपसातचं कोल्ड वॉर सुरू आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये कुरबुर असल्याचे समजतेय. दरम्यान आता अशीच एक बातमी आता समोर येत आहे.
नवी मुंबईत महायुतीत राजकीय युद्धाला सुरुवात झालीय. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा निवडणुकीनंतर कोल्ड वॉर सुरू होतं. आता मात्र महापालिका थेट युद्ध सुरू झालय.
ऐरोली आणि ऐरोली विधानसभा निवडणुकीतील वाद निकालानंतर देखील शमण्याचं नाव घेत नाही. आज पहाटे ६ वाजल्यापासून ऐरोलीतील सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लबवर वनविभाग, सिडको आणि नवी मुंबई महापालिका याची संयुक्तपणे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई भाजपच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत बोलली जातेय.. कारण स्पोर्ट्स क्लब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचं आहे.
नवी मुंबईतील विधानसभा महापालिकेचं बागुल चार महिन्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ही कारवाई महत्त्वाची ठरली. आज पहाटे पाच वाजल्यापासून संपूर्ण ऐरोली मतदार संघात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेले नवी मुंबईकरांची मात्र घाबरगुंडी उडाली होती. सध्या भरत पाकिस्तान युद्ध सुरू आहे. अशात तेवढा मोठा फौजफाटा पाहिल्याने नागरिकांना अनेक प्रश्नांनी सतावून सोडलं होतं. मात्र हे कोणतं युद्ध नसून नेहमी प्रमाणे चालत आलेल महायुतीतील राजकीय युद्ध असल्याचं समजताच सर्वांनी मोकळा श्वास घेतला.