राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या महिला विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , लोकसभेला तिकीट न मिळाल्यानं त्या नाराज होत्या. त्यांनी अखेर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. तेजस्वी घोसाळकर शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता असून, त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.