उपमुख्यमंत्री अजित पवारांची शहीद जवानाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट, म्हणाले...
उपमुख्यमंत्री अजित पवारांची शहीद जवानाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट, म्हणाले...
img
दैनिक भ्रमर

राज्यातील घडामोडींन वेग आला आहे. दरम्यान आता नांदेड जिल्हयातील देगलूर येथील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर होते .

जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असताना जवान सचिन वनंजे यांचे वाहन दरीत कोसळून त्यांना वीरमरण आले. सहा मे रोजी हा अपघात घडला होता . दरम्यान अजित पवार यांनी शहीद जवान सचिन वनंजे यांच्या आई - वडील आणि पत्नीची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाऊन घेतल्या. आपण शहीद जवानाच्या पत्नीशी बोललो. त्यांच्या पत्नीचं ऐकून घेतलं आहे. त्यांना काय मदत करता येईल , त्यांच्या बहुतेक ज्या गोष्टी आहेत ते कशा मार्गी लावता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असं अजित पवार म्हणाले

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर जवळील तंगधार परीसरात 6 मे रोजी ही घटना घडली. नियोजित कर्तव्यावर जाताना सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळलं. या अपघातात नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथील सचिन वंनजे हे शहीद झाले आहे.  गेल्या दीड वर्षांपासून ते श्रीनगरमध्ये ड्युटीवर होते.६ मे रोजी त्यांची पोस्टींग इतरत्र झाली होती. सदर चौकीकडे सैन्य दलाचे वाहन त्यांना घेऊन जात असताना आठ हजार फूट खोल असलेल्या दरीत कोसळलं. या दुर्घटनेत ते शहीद झाले. त्यांचं लग्न २०२२ मध्ये झालं असून त्यांना ८ महिन्याची मुलगी आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group