पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाक तणाव वाढला आहे. दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू असून भारतीयांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात एक भारतीय जवान शहिद झाला आहे. मुरली नाईक असं शहिद झालेल्या जवानाचं नाव आहे. ते जम्मूमध्ये तैनात होते.
आज सकाळी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात मुरली यांना वीरमरण आलं आहे. मुरली नाईक हे मुंबईच्या घाटकोपर परिसरातील कामराजनगरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. मुरली मुळचे आंध्रप्रदेशचे रहिवासी आहेत. अलीकडेच ते राहत असलेली इमारत पुनर्विकास प्रकल्पात केली. त्यामुळे मुरली नाईक यांचं कुटुंब काही दिवसांसाठी आंध्रप्रदेशात राहायला गेलं होतं.
शहीद जवान मुरली नाईक यांना 9 मे 2025 रोजी पाकिस्तानशी लढताना वीरगती प्राप्त झाली. यानंतर संपूर्ण शहरावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसेच देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय.